1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (12:48 IST)

केकमध्ये ड्रग्ज मिसळून विक्री करणाऱ्या तरुणाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

केक आणि ब्राउनीझ मधून ड्रग्स मिसळून विक्री करणाऱ्या एका तरुणाला NCB कडून अटक करण्यात आली. सदर आरोपीची बेकरी कमी ड्रग्स लॅब असून आरोपी मानसोपचारतज्ज्ञ आहे. रहमिन रफिक चरणिया (24)असे या आरोपीचे नाव असून हा दक्षिण मुंबईच्या एका हॉस्पिटल मध्ये कामाला होता.  
 
तसेच हा आरोपी कॉलेज मध्ये असताना ड्रग्सचा धंदा करत होता. एनसीबीने 12 जुलै 2021 रोजी माझगाव परिसरात असलेल्या त्याच्या बेकरीवर छापा टाकला आणि तिथून 10 किलोचे हशिशचे ब्राउनी केक बनवलेलं आढळले. हे केक पॅक करून डिलिव्हरी करण्यासाठी  ठेवले होते. आरोपी रहमीनची बेकरी असून तो केक आणि ब्राउनी तयार करायचा आणि त्यात हशिश, गांजा, चरस ड्रग्स टाकायचा. 

NCB ने याच्या राहत्या घरावर धाड टाकल्यावर त्याच्या घरातून 1.7 लाख रोकड आणि opium सापडले. त्याला अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.