मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (16:39 IST)

वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने घातली गाडी, चालकाला अटक

kharghr Traffic police
वाहतुकीचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.काही जण वाहतुकीचे नियम पाळतात तर काही नियमांना धता देतात  आणि स्वतःची आणि इतरांच्या जीवाची पर्वा करत नाही. स्वतःचा आणि इतरांनाच जीव धोक्यात टाकतात. अशा प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांबद्दल कारवाई केली जाते. त्यांना दंड आकारावा लागतो. असाच काहीसा प्रकार मुंबईतील खारघर कोपरा भागात घडला आहे. 

मुंबईतील खारघरच्या कोपरा येथे वाहतूक पोलीस गादेकर हे विशेष कारवाईसाठी तैनात असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यासाठी ते पुढे गेले आणि त्यांनी चुकीच्या दिशेने येणाऱ्या कार चालकाला थांबण्यास सांगितले. त्या कार चालकाने त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी कारचे बॉनेट हातात घट्ट धरून ठेवले ते पाहून कार चालकाने अधिक वेगाने कार पळवायला सुरू केले. ते तसेच बॉनेटला अडकून कारसह फरफटत गेले. रस्त्यावरील लोक हा भयानक दृश्य पाहत होते मात्र कोणालाही काहीच करता येत नव्हते. अखेर गादेकरांचे सहयोगी असलेले पोलीस निवृत्ती नाईक यांनी प्रसंगावधान राखत एका दुसऱ्या गाडीने पाठलाग करत त्या वाहनाला थांबविले आणि कार चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सर्व प्रकार गाडीच्या पाठीमागे असलेल्या वाहनातील नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे.