शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (22:24 IST)

अहो आश्चर्यम , समुद्रात हरवलेली सोन्याची चैन पुन्हा त्यालाच सापडली

Gold Chain
वसईच्या भूईगाव या समुद्रात हरवलेली एक सोन्याची चैन पुन्हा सापडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्या तरूणाची ही सोन्याची चैन हरवली होती, त्याच तरूणाला ही चैन 48 तासांत सापडली आहे. या तरूणाचे नाव प्रितम डायस असे असून दोन तोळ्याची ही त्याची सोन्याची चैन होती. 
 
या घटनेत वसईचा प्रितम डायस हा तरूण भुईगाव समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना समुद्राची भ्रमंती करवतो. त्याच्या स्वत:च्या मालकीची बोट देखील आहे.  नेहमीप्रमाणे तो खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटी मध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होता. यावेळी भरतीमुळे समुद्रात कपडे भिजू नये म्हणून त्याने टी-शर्ट व बनियन काढले होते. या धावपळीत त्याच्या गळ्यात असलेली पावणे दोन तोळ्याची सोन्याची चैन व त्याला अडकून असलेली रोझरी समुद्रात पडली. त्यानंतर घरी आल्यावर  त्यांच्या गळ्यात सोन्याची चैन आणि रोझरी सापडली नाही. त्यामुळे  समुद्रात पडल्याचा अंदाज बांधत हरविल्याची खंत व्यक्त केली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor