रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (08:41 IST)

मृतदेह दरीत टाकायला गेला आणि स्वतःच प्राण गमावून बसला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे एक विचित्र घटना घडली आहे.
 
कराड येथून दोन व्यक्ती मृतदेह फेकण्यासाठी इथं आल्या, परंतु मृतदेह दरीत फेकताना त्यातील एक माणूस पाय घसरून दरीत पडला आणि त्याचाही मृत्यू झाला.
 
वीट व्यावसायिक भाऊसाहेब माने याने एका व्यक्तीला कर्जाने पैसे दिले होते. ते त्याने परत न केल्यामुळे भाऊसाहेबने त्याला मारहाण केली.
 
या मारहाणीत त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या भाऊसाहेबाने एका साथीदाराबरोबर आंबोली गाठले.
 
देणेकऱ्याचा मृतदेह फेकताना भाऊसाहेबही दरीत कोसळला आणि त्याचाही मृत्यू झाला. ही घटना त्याच्या साथीदाराने पोलिसांना सांगितली आहे. ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केली आहे.
Published By -Smita Joshi