1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (20:37 IST)

Threatened Mumbai again पुन्हा मुंबई हादरवण्याची धमकी, फोनवर सांगितले - मी अनेक ठिकाणी बॉम्ब लावले आहेत

maharashatra lockdown
मुंबई एका फोन कॉलने देशाची आर्थिक राजधानी ढवळून निघाली. फोन करणाऱ्याने सांगितले की, मी मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्ब पेरले आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा फोन हेल्पलाइन नंबर 112 आला होता. पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा कॉलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. फोन कॉलनंतर मुंबईत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
 
मुंबईत तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याचे फोन कॉल्स आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणा कॉलरची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून पुढील कारवाई करता येईल.
 
इन्फिनिटी मॉल अंधेरी, पीव्हीआर मॉल जुहू आणि सहारा हॉटेल विमानतळावर स्फोट होणार असल्याचा दावा कॉलरने केला आहे. रात्री 10.30 च्या सुमारास हा कॉल करण्यात आला. फोन कॉलनंतर मुंबईत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Edited by : Smita Joshi