मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (13:46 IST)

वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी; 'सावध राहा रुपेश'!

vasant more
पुण्याचे मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. रुपेश मोरे यांच्या गाड़ीवर 'सावध राहा रुपेश' असा मजकूर लिहिलेली चिट्ठी अज्ञाताने ठेवल्यावर या प्रकरणाची तक्रार वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली. 
 
या प्रकरणात अधिक माहिती अशी की, वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ते कात्रज परिसरात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या वसंत मोरे यांच्या मुलाच्या रुपेश मोरे यांच्या गाडीवर अज्ञाताने धमकी दिलेली चिट्ठी मिळाली.या संदर्भात मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आता  ही धमकीची चिट्ठी कोणी लिहिली हे शोधण्याचे आव्हाहन पोलिसाच्या पुढे आहे. 
 
या वर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली की, मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप हा प्रत्येक मुलासाठी आयडॉल असतो. आमचे ही तसच आहे पण हे कोणाला का खटकतंय तेच समजत नाही. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणीतरी आपल्या कुटुंबाबतीत असा विचार करायचा असं का? तेच कळत नाही. पोलीस ह्याचा शोध घेतच आहे. धमकी देणारा जो कोणी असेल त्याने लक्षात ठेवावं की  त्याचा बाप वसंत मोरे आहे.