बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (12:21 IST)

मनसेचे सैनिक अयोध्येत दाखल

maharashatra navnirman sena
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 5 जून अयोध्या दौरा करण्याचे जाहीर केले होते. त्यांचा दौरा उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या केलेल्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.बृजभूषणसिंह यांचे म्हणणे होते की राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांचा अपमान केला असून त्यांना मारहाण करण्यात आली होती. 
 
त्यासाठी त्यांनी उत्तरभारतीयांची माफी मागावी.नाहीतर आम्ही राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. त्यामुळे त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. नंतर त्यांची प्रकृतीअस्वस्थ झाल्यामुळे त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला असून सध्या त्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे.अयोध्या रद्द करण्याबाबतचे कारण राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत सांगितले होते. 
 
राज ठाकरे यांचाआज 5 जूनचा अयोध्या दौरा काही कारणास्तव रद्द झाला पण त्यांचा दौरा पूर्ण केल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. ते आज अयोध्येत असून त्यांनी सोशल मीडियावर अयोध्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
 
त्यात त्यांनी आज माननीय राजठाकरे साहेबांचा अयोध्या दौरा होता, तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला पण त्यांच्या हा दौरा मनसेच्या सैनिकांनी पूर्ण केला असून मराठी माणसाचा स्वाभिमान जपला आहे. असं लिहिले आहे. त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओ मध्ये एक मराठी माणूस अयोध्येत आला असून त्याने रामल्लाचं दर्शन घेतलं आहे. प्रत्येक हिंदू आणि भारतीयांनी अयोध्येत येऊन रामल्लाचं दर्शन घेतले पाहिजे. असं म्हटले आहे.