शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (00:41 IST)

तुमचा मुसेवाला करून टाकू’; सलमान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

salman khan
पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आता अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडिल सलीम खान यांना धमकीचं पत्र मिळालं आहे. सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. याप्रकरणी बांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी 7:30 ते 8:00 च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
 
मनोरंज सृष्टीत सध्या भीतीचं सावट असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. पंजाब सरकारने मूसेवालाची सुरक्षा कमी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. आता सलमान खानला आलेल्या या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.