रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 जुलै 2024 (13:44 IST)

आर्थिक त्रासाला कंटाळून अभियंतांची मुली आणि पत्नीशी गोष्टीकरून अटळ सेतू वरून मुंबईच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या

water death
मुंबईत आर्थिक त्रासाला कंटाळून एका 38 वर्षीय अभियंताने बुधवारी दुपारी मुंबईच्या अटळ सेतू वरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीनिवास असे या मयत अभियंताचे नाव आहे. अद्याप मृतदेह सापडला नाही. असे पोलिसांनी सांगितले. 

पोलीस स्थानिक मच्छीमारांसह त्याचा शोध घेत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून मयत श्रीनिवास आपल्या गाडीतून अटळ सेतूवर जातो आणि पुलाच्या रेलिंग वरून समुद्रात उडी मारल्याचे दिसत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार,श्रीनिवास बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास घरातून बाहेर पडला त्याने गाडी मधून पत्नीशी आणि चार वर्षाच्या मुलीशी फोन वरून गोष्टी केल्या. तो असं काही करणार आहे हे कोणालाच माहित न्हवते.   
श्रीनिवासची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्याने 2023 मध्ये कुवैत मध्ये कामाला असताना फरशी स्वच्छ करणारे द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले होते. त्याने आर्थिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.त्याचे मृतदेह अद्याप सापडले नसून शोध सुरु आहे.त्याच्या मृत्यू नंतर कुटुंबीयांची स्थिती वाईट आहे. 
 
Edited By- Priya Dixit