मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 22 जानेवारी 2022 (10:09 IST)

मुंबईतील ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला आग, दोघांचा मृत्यू

Two killed in 20-storey building fire in Mumbai's Taddev area  मुंबईतील ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला आग
मुंबईत शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. येथील तारदेव परिसरातील भाटिया रुग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग लागली. ही आग 20 मजली कमला बिल्डिंग नावाच्या इमारतीत लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सहा वृद्धांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या आधाराची गरज असलेल्या सहा जणांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आग आटोक्यात आली असली तरी धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, इमारतीमध्ये लेव्हल थ्री आग लागली होती. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 13 बंबांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवता आले. मात्र, इमारतीमध्ये बचावकार्य सुरूच आहे. इमारतीजवळ पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.