सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (15:44 IST)

भाजपकडून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

राणीबागेत पेंग्विनच्या पिल्लाला 'ऑस्कर' हे इंग्रजी नाव दिल्यावरून भाजपने टीका केली. यामुळे महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या आणि त्यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना, पुढच्या वेळी हत्तीच्या पिलाला चंपा, तर माकडाच्या पिलाचे नाव चिवा ठेवू, असे म्हटले होते. त्यांचा रोख चंद्रकांत पाटील आणि चित्रा वाघ यांच्यावर होता. यानंतर आता भाजप नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनीही पेडणेकरांवर खोचक टीका केली आहे. 
 
 महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत त्यांनी एक ट्विट केले आहे. यात, "ओळखा पाहू कोण ??? असे म्हणत,  राणीच्या बागेत नांदते, हत्ती सारखी डुलते, ठेकेदाराच्या कुरणावर चरते, कुरण न दिल्यास डिवते आणि अख्खी फाईलच गिळते," असे शिरवाडकर यांनी म्हटले आहे.