शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (19:40 IST)

दुर्देवी ! 3 तृतीयपंथींचा नदीपात्रात बुडून मृत्यू,मृतदेहांचा शोध सुरु

गुरुवार पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.घटस्थापनेचा निमित्ताने दुर्गापूजा करण्यासाठी सहा तृतीयपंथी अंघोळीसाठी नदीत गेले असताना. त्यापैकी तीन तृतीयपंथींचा बुडून मृत्यू झाला.ही दुर्देवी घटना पारोळ खराटतारा येथे तानसा नदीची आहे.येथे खानिवडे येथे टोलनाका असल्याने तृतीय पंथांचा वावर असतो. त्यामुळे नदीत अंघोळ करण्यासाठी सहा तृतीयपंथी गेले त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या साथीदारांनी ही माहिती विरार पोलिसांना दिली.विरार-वसई शहरातील महापालिकेच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी नदीत शोधमोहीम सुरु केली आहे.तानसा नदीत त्यांच्या मृतदेहांचा शोध बोटीद्वारे घेतला जात आहे. अरिका(40), सुनीता(27), प्राची( 23)असे या मयत झालेल्या तृतीयपंथींची नावे आहे.ही दुर्देवी घटना गुरुवारी दुपारच्या वेळीस घडली आहे.