बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (15:36 IST)

डिलिव्हरी बॉयकडून 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

मुंबई- महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. अवघ्या 6 वर्षांच्या मुलीवर कथित बलात्कार केल्याच्या प्रकरणात चारकोप पोलीस स्टेशनने एका डिलीव्हरी बॉयला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून पोलिसांना घटनेशी संबंधित माहिती मिळत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप पोलीस स्टेशन परिसरात 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले. या घटनेत स्थानिक लोकांनी बराच गोंधळ घातला जेव्हा एकाही आरोपीची ओळख पटली नाही आणि आरोपीला पकडण्याची पोलिसांकडे मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून, जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा कळले की, ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एक डिलिव्हरी बॉयही तेथे आला होता.
 
पोलिसांनी डिलिव्हरी बॉयची चौकशी केली असता त्याने मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली. न्यायालयाने आरोपीला 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
नेमकं काय घडलं?
आरोपी डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी करण्यासाठी एका इमारतीजवळ गेला असताना तिथे एक 6 वर्षांची मुलगी एकटी उभी होती. डिलिव्हरी बॉयने तिला पत्ता विचारला आणि नंतर तो मुलीला तिथे घेऊन गेला. त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि तिथून फरार झाला. पीडितेने आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत डिलिव्हरी बॉयला अटक केली.