शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:20 IST)

मुंबईत ५ ते ६ ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार

मुंबई शहरातील काही प्रभागांमध्ये पुढील काही तासांसाठी संपूर्ण पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. परळच्या काही भागात ५ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान ही पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या वेळेत महापालिकेच्या एफ दक्षिण प्रभागातील परळ, काळेवाडी, नायगाव भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यादरम्यान पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल.
 
बृहन्मुंबई महापालिकेच्यावतीने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजलयापासून ते बुधवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परळच्या काही भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. ज्या वेळेत पाणीपुरवठा बंद असेल त्या वेळेत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार आहे. तर एफ दक्षिण विभागात पाणी पुरवठा करणाऱ्या ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या काढून टाकण्यात करण्यात येणार आहेत. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेने दिली आहे.