मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (16:36 IST)

वांद्रे गर्दी प्रकरण: विनय दुबेला जामीन मंजूर

वांद्रे कोर्टाद्वारा १५ हजाराच्या जातमुचलक्यावर विनय दुबेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी वांद्रे स्टेशनबाहेर हजारोच्या संख्येत परप्रांतीय मजुरांची गर्दी झाली होती. ते सगळे घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी करत होते. लॉकडाऊन असताना हे चित्र विचलित करणारं होतं तेव्हा या प्रकरणी लोकांना व्हिडीओद्वारे जमण्याचे आवाहन करणाऱ्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. 
 
लॉकडाऊनच्या पहिला टप्पा संपत असताना वांद्रे स्टेशनबाहेर जमावाला गोळा करण्यासाठी विनय दुबेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विनय दुबे उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष असून याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी चांगलाच जनसंपर्क आहे. १४ एप्रिलचा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. तरीही त्यादिवशी वांद्रे स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.
 
या जमावाला कारणीभूत ठरलेल्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. त्याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.