शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (08:05 IST)

सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे पोलीस दलातून बडतर्फ

मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी आणि लखन भैया बनावट चकमक प्रकरणात शिक्षा भोगत असलेला विनायक शिंदेला मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. सचिन वाझे, रियाज काझी पाठोपाठ विनायक शिंदे ही पोलीस दलातून बडतर्फ झाला आहे.
 
विनायक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात कार्यरत होता. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे यांना अटक केली होती. विनायक शिंदे याने सचिन वाझे सोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर एटीएसचा संशय अधिक बळावला होता.
 
याआधी नोव्हेंबर २००६ मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणात देखील प्रदीप सुर्यवंशी याच्यासह विनायक शिंदेही दोषी आढळला होता. यानंतर विनायक शिंदेला सेवेतून निलंबित करण्यात आले. सचिन वाझे, सूर्यवंशी आणि विनायक शिंदे या तिघांनी एकत्र काम केले आहे. विनायक शिंदे मे २०२० पासून पॅरोलवर बाहेर होता. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करण्याच्या कटातही विनायक शिंदेचा सहभाग होता की याबाबत तपास होत आहे.