गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (15:20 IST)

मुंबईत सखल भागामध्ये पाणी साचलं, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

rain
मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत.  दुपारी 4 वाजून 10  मिनिटांनी समुद्रात  उंच लाटा समुद्रात उसळणार आहेत.
 
मुंबईत भरतीवेळी 4 मीटरच्या लाटा उसळतील अशी शक्यता आहे. या भरतीच्या काळात मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास, समुद्राचं पाणी ड्रेनेज लाइनमधून मुंबई शहर आणि उपनगरात पोहोचेल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
 
मुंबईत सखल भागामध्ये पाणी साचलंय. वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हिंदमाता परिसर जलमय झाला असून मुंबई महानगरपालिकेने केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. मुसळधार पावसाचा लोकल रेल्वेला फटका बसला आहे मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वाहतूक उशीराने सुरु आहे. कुर्ला रेल्वे रुळ पाण्याखाली गेला आहे. भांडुप एल बी एस मार्ग पन्हालाल कंपाऊंड जवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एल बी एस मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही प्रभावीत झाली आहे. या मार्गा शेजारून जाणाऱ्या न्यायालयाची साफसफाई नीट न झाल्यामुळे नाल्यातील पाणी हे थेट रस्त्यांवर येत आहे.
 
त्यामुळे हा रस्ता जलमय झालेला आहे. तर भांडुप स्टेशन परिसरात देखील पाणी साचलंय.  घाटकोपर पंचशील नगर परिसरामध्ये संरक्षक भिंतीचा काही भाग हा घरांवर कोसळल्यामुळे एका घराचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.मुलुंड ,विक्रोळी ,घाटकोपर, कांजुर परिसरातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली.