शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (18:24 IST)

नर्सरी ते पहिली वर्गात प्रवेशासाठी मुलांचे वय किती असावे?; सरकारचा मोठा निर्णय

school bag
शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय किती असावे, याविषयी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सुधारित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सुधारित परिपत्रकानुसार प्लेग्रुप नर्सरी आणि पहिलीत प्रवेश घेताना 31 डिसेंबर 2022 पर्यंतचे आरटीई तसंच नवी वर्षात शाळांमध्ये प्रवेशाचं वय निश्चित करण्यात आलं आहे. 
 
यानुसार प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 4 वर्ष 5 महिने
ज्युनिअर केजीसाठी 5 वर्ष 5 महिने
सीनिअर केजी 6 वर्ष 5 महिने आणि 
पहिलीसाठी 7 वर्ष 5 महिने वय आवश्यक असणार आहे.
 
याआधी प्ले ग्रुप, नर्सरीसाठी 3 वर्ष, ज्युनिअर केजीसाठी 4 वर्ष, सीनिअर केजीसाठी 5 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष वय होतं. त्यात आता बदल करण्यात आला आहे.
 
जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. 
 
त्यामुळे आता शाळांना पूर्व प्राथमिकसाठी कमी-जास्त वयाचं कारण देऊन प्रवेश नाकारता येणार नाही.