1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जुलै 2024 (09:53 IST)

वरळी हिट अँड रन प्रकरण :आरोपीच्या वडिलांचा ड्रायव्हरला अडकवण्याचा कट रचण्याचा पोलिसांचा दावा

Mumbai BMW Car Accident
वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपींच्या वडिलांचा चालकाला अडकवण्याचा कट असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. आरोपीला वाचवण्यासाठी आरोपीच्या वडिलांनी मिहीरला चालकासह लोकेशन बदलण्यास सांगितले आणि त्यांचे या संदर्भात अनेकदा बोलणे झाले.आपल्या मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी चालकाला दोषी ठरवण्याचा कट रचला असे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले. 

या प्रकरणी आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली मात्र आरोपी अपघातानंतर फरार झाला. न्यायालयाने राजेश शाह यांचा जामीन मंजूर केला 

या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शाहच्या विरोधात लूक आउट सर्क्युलर जारी केले आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असून या साठी सहा पथके नेमली आहे. अपघाताच्या वेळी आरोपीने मद्यपान केल्याचा संशय पोलिसानं आहे. 

अपघातानंतर आरोपी ने पळून जाण्यापूर्वी त्याची कार वांद्रेला सोडली आणि चालक राजऋषीला कला नगर जवळ सोडून पळाला.अपघात झालेल्या कारचा विमा संपला असून कारचा विमा उतरवला नव्हता. 
 
रविवारी वरळीतील अट्रिया मॉलजवळ  सकाळी 5 वाजेच्या सुमारास एका बीएमडब्ल्यू कार ने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला उडवलं होत 

या अपघातात पती जखमी झाला तर पत्नीचा मृत्यू झाला. या अपघातापासून आरोपी मिहीर शाह हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit