मुंबईतील हॉटेलच्या खोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बायको आणि मावशीला दोषी ठरवले
मुंबईतील विलेपार्लेच्या एका हॉटेलच्या खोलीत एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयतचे नाव निशांत सुमनराज त्रिपाठी असे आहे. त्यांची आई एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. घटनेननंतर त्यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निशांतने हॉटेलच्या खोलीच्या दारावर डू नॉट डिस्टर्ब' चा बोर्ड लावला आणि वॉशरूम मध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीत त्याचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदनानन्तर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांना निशांतच्या मोबाईलमध्ये एक सुसाईडनोट सापडली असून त्याने नोट कंपनीच्या वेबसाईटवर टाकली होती. त्याने मृत्यूसाठी बायको आणि मावशीला मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. संदेश इंग्रजीत आहे. त्यात लिहिले आहे की हे बेबी, तू हा मेसेज वाचे पर्यंत मी जगातून निघाला असेन.मी तुझा द्वेष करू शकलो असतो पण असे मी करत नाही. या क्षणी मी प्रेमाची निवड केली. मी तुझ्यावर प्रेम केले आज देखील करतो. मी तुला दिलेले वचन कधीही संपणार नाही. माझ्या आईला माहीत आहे की, मी जे काही सहन केले आहे त्यासाठी तू आणि मावशी जबाबदार आहे. माझ्या आईला त्रास देऊ नकोस, आधीच ती खचली आहे.
या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी निशांतची पत्नी आणि मावशीच्या विरुद्ध भारतीय दंड संहिताच्या आधारे कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. निशांतला मानसिक तणाव होता की त्याला कोणता प्रकारचा छळ सहन करावा लागला आहे याचा तपास पोलीस करत आहे. अदयाप या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. पोलिसांनी निशांतची पत्नी आणि मावशीला नोटीस बजावल्या आहे. त्या दोघी चौकशीसाठी तयार आहे.
Edited By - Priya Dixit