शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?
Written By वेबदुनिया|

राज ठाकरेंना ओळखत नाही- जया बच्चन

IFMIFM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपण ओळखत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी कोहीनूर मिल्सची जागा दान करून दिल्यास मी मुंबईतही ऐश्वर्याच्या नावाने मुलींसाठी शाळा उघडू शकते असे आव्हानही त्यांनी केले आहे.

बाळासाहेब ठाकरे माझ्या वडीलांप्रमाणे असून त्यांचे सुपूत्र शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मी ओळखते. पण, दुसर्‍या कोणत्याही ठाकरे नावाच्या व्यक्तीला त्या ओळखत नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या महाराष्ट्राने बिग बीला सुपरस्टार केले त्यांनाच उत्तरप्रदेशाबद्दल अधिक अभिमान असल्याची टिका राज ठाकरे यांनी काल केली होती. या टिकेला उत्तर देतांना जया बच्चन यांनी वरील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बच्चन कुटूंबियांनी नुकतेच बारांबकी येथे आपली सून ऐश्वर्याच्या नावाने मुलींसाठी शाळा काढली आहे.