शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (12:09 IST)

लग्नानंतर नवरा-नवरीसह 100 जण क्वारंटाइन

कोरोनाच्या थैमानामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सर्व लग्न समारंभ रद्द करण्यात आले होते. परंतू चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात सूट देण्यात आली. ज्यात नियम आणि अटींचे पालन करुन लग्न करण्‍याची देखील सूट‍ देण्यात आली. परंतू दिल्लीत एका लग्नात सामील झाल्यामुळे नवरा-नवरीसह पाहुण्यांची अडचण तेव्हा वाढली जेव्हा लग्नानंतर लगेचच नवरा-नवरीसह 100 जणांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं. 
 
CISF मध्ये कार्यरत नवरीचे भाऊजी मेहुणीच्या लग्नात सामील झाले आणि नंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यात आला. त्यामुळं त्यांच्या संपर्कात आलेल्या नवविवाहित जोडप्यालासह लग्नास उपस्थित शंभर जणांनाही 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं. 
  
सीआयएसएफमध्ये तैनात असलेला सैनिक यांची आरोग्य तपासणी छिंदवाडा-होशंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आली. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी केली जात आहे.