शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (09:21 IST)

ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2 लाख रोजगार मिळणार - नितीन गडकरी

जुन्या वाहनांना रिसायकल करणाऱ्या पहिल्या स्क्रॅप प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.
या स्क्रॅप पॉलिसीमुळे आरोग्याशी निगडीत समस्या आणि प्रदूषण कमी होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होईल आणि परिणामी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2 लाख रोजगार मिळतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.भारतात ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून गाड्या चालवण्याची तयारी करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
मारुती आणि टोयोटा यांनी मिळून सुरू केलेल्या नोएडातल्या या स्क्रॅप युनिटमध्ये दरवर्षी 24 हजार जुन्या गाड्या मोडीत काढल्या जातील. सुरुवातीला या युनिटमधून दरमहिन्याला 2,000 वाहनं स्क्रॅप करण्यात येणार.