सोमवार, 26 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रायपूर , बुधवार, 17 मे 2017 (11:37 IST)

20 नक्षलवांद्याचा सीआरपीएफकडून खात्मा

ठळक बातमी
सुरक्षा दलाला नक्षलविरोधी मोहिमेत यश मिळाले आहे. बिजापूर येथे नक्षलवादी विरोधी अभियानात सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुकमा हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाल्यानंतर सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांना धडा शिकविण्यासाठी मोठ्या मोहिमेची आणखी केली होती. या ऑपरेशनला यश आले आहे.
 
सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान अजूनपर्यंत नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले नाहीत आणि त्यांची ओळखही पटलेली नाही. बासागुडा परिसरात कोबरा व जिल्हा पोलीस दलाची एक संयुक्त तुकडी गस्त घालत होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून अचानक गोळीबार सुरू झाला. सीआरपीएफच्या जवानांनी याचे सडेतोड प्रत्युत्तर देत नक्षवलाद्यांवर तुफान गोळीबार केला. या चकमकीत सुमारे 20 नक्षलवादी मारले गेल्याचा दावा सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक देवेंद्र चौहान यांनी केला आहे.