गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (11:06 IST)

दिल्लीमधील नरेला मध्ये फॅक्ट्रीत भीषण आग, 3 लोकांचा जाळून मृत्यू

fire
दिल्लीमधील नरेला मध्ये एका फॅक्ट्रीला भीषण आग लागली असून या अग्नितांडव मध्ये 3 लोक जिवंत जाळले आहे. 
 
देशाची राजधानी दिल्ली मध्ये एकदा परत आग लागली आहे. नरेला स्थित एका फॅक्ट्रीमध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागली आहे. या मध्ये 3 मजुरांचा जालौन मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यामध्ये यश आले. पोलिसांनी प्रकरण नोंदवले व तपास सुरु केला आहे. 
 
सर्व लोकांना नरेला मधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तीन जणांना मृत घोषित केले. तर इतर लोकांवर उपचार सुरु आहे. दिल्ली फायर विभागाने या घटनेची माहिती देत सांगितले की, शनिवारी म्हणजे आज पहाटे साडे तीन वाजता नरेला स्थित श्याम कृपा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड फॅक्ट्रीमध्ये आग लागल्याची सूचना मिळाली. 
 
ही सूचना मिळताच टीम घटनास्थळी पोहचली व आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी कार्य सुरु केले. याचा वेळी आगीच्या विळख्यामधून 9 जणांना बाहेर काढण्यात आले पण त्यामधील 3 जणांना मृत घोषित केले. 
 
प्राथमिक माहितीमधून समजले की, कच्चे मूग गॅस बर्नवर भाजण्याचे काम सुरु होते व पाईप लाईन मधून गॅस लीक झाल्याने आग पसरली. ज्यामुळे कंप्रेसर गरम झाले व स्फोट झाला.