मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (09:36 IST)

शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा : ३०८ पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स सापडले

प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणारा ट्रॅक्टर मोर्चा हायजॅक करण्यासाठी पाकिस्तानमधील ३०० ट्विटर हॅण्डल्सची माहिती सापडल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. 
 
गुप्तचर यंत्रणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार लोकांची दिशाभूल करत आंदोलनात मोर्चात गोंधळ घालण्यासाठी १३ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान पाकिस्तानातून जवळपास ३०० ट्विटर हॅण्डल्स तयार करण्यात आली आहेत. तरी हे आव्हान स्वीकार करत पोलीस सुरक्षितेत कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल.
 
सूत्रांप्रमाणे पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्सवर Farmer Protest, Tractor Rally संबंधी हॅशटॅगचा वापर होत आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका दिसून येत आहे. अशात दिल्ली पोलिस ट्रॅक्टर मोर्चा रद्द करावा अशी मागणी करत असताना शेतकरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे. अशात कायदा, सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.