शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (12:34 IST)

4 अमेरिकन डिप्लोमॅट दिल्लीत ऑटो चालवत ऑफिसला पोहचतात, जाणून घ्या कारण

4 American diplomats drive to office in Delhi
नवी दिल्ली- सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये काही परदेशी महिला भारतीय रस्त्यावर ऑटो रिक्षा चालवताना दिसून आल्या आहेत. ऑटो चालवणाऱ्या महिला सामान्य नसून त्या अमेरिकन डिप्लोमॅट आहेत.
 
एनएल मेसन, रुथ होल्मबर्ग, शेरिन जे किटरमन आणि जेनिफर बायवॉटर्स या यूएस दूतावासाच्या चार महिला अधिकारी ऑटोमधून ऑफिसला जातात. त्यासाठी शासनाकडून मिळालेली बुलेट प्रूफ वाहनेही त्यांनी सोडली आहेत. ऑटोमध्‍ये अमेरिकन राजनयिकांना पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे.
 
या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ऑटो चालवण्याची मजा तर असतेच, पण अमेरिकन अधिकारीही सामान्य माणसेच असतात याचे हे उदाहरण आहे. ऑटोने दूतावासात जाण्याचा उद्देश भारतीयांशी संबंध दृढ करणे तसेच लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रवृत्त करणे हा आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात काम करू शकतात हा संदेशही त्यांना द्यायचा आहे. त्यांच्यापासून कोणतेही क्षेत्र अस्पर्शित नाही.
 
अमेरिकेचे राजनयिक एनएल मेसन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्या पाकिस्तानमध्ये असताना देखील ऑटोमध्ये प्रवास करत असे, भारतात येताच त्यांनी सर्वात आधी ऑटो खरेदी केली. आता मी यातच प्रवास करते.
 
आणखी एक अमेरिकन राजनयिक शॅरिन जे. किटरमन यांनी मेक्सिकन राजदूताच्या ऑटो राईडबद्दल ऐकले होते. भारतात येऊन मेसनच्या ऑटोमधला प्रवास कळला. यावर मी दिल्लीत प्रवासासाठी ऑटो घेण्याचेही ठरवले.