गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: ग्रेटर नोएडा , शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (13:07 IST)

Greater Noida Lift Collapse: ग्रेटर नोएडामध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 4 ठार

lift collapses
PTI
building lift collapses ग्रेटर नोएडा पश्चिम येथील एका हाऊसिंग सोसायटीत भीषण अपघात झाला आहे. सोसायटीच्या बांधकामाधीन इमारतीतील लिफ्ट अचानक कोसळून खाली पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
   
शुक्रवारी सकाळी आम्रपाली ड्रीम व्हिला हाऊसिंग सोसायटीमध्ये हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी या गृहनिर्माण संस्थेत काम करणारे कामगार लिफ्टवर बसले होते, ती अचानक तुटून खाली पडली. या अपघातात 4 मजुरांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.
 
जिल्हा दंडाधिकारी मनीष वर्मा आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणाचे सीईओ रवी कुमार एनजी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. हे प्रकरण ग्रेटर नोएडातील बिशरख पोलीस स्टेशन परिसरातले आहे.