बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (10:29 IST)

दरड कोसळल्याने कन्नूर-बेंगळुरू एक्स्प्रेसचे 5 डबे रुळावरून घसरले, सर्व प्रवासी सुखरूप

कर्नाटकातील बंगळुरू येथे मोठा रेल्वे अपघात टळला. बेंगळुरू विभागातील टोप्पुरु-सिवाड़ी दरम्यान अचानक खडक पडल्याने कन्नूर-बेंगळुरू एक्स्प्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातातात सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 3.50 वाजता ही घटना घडली. या ट्रेनमध्ये 2348 प्रवासी होते आणि ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
कन्नूरहून ही ट्रेन गुरुवारी संध्याकाळी 6:05 वाजता सुरू झाली. दक्षिण पश्चिम रेल्वे मुख्य सार्वजनिक रेल्वे अधिकारी यांनी सांगितले की, चालत्या ट्रेनवर अचानक दरड कोसळल्याने ही घटना घडली, ज्यामुळे B1, B2 (थर्ड एसी), S6, S7, S8, S9 आणि S10 (स्लीपर कोच) रुळावरून खाली घसरले.
 
बंगळुरूचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) श्याम सिंग, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागीय पथक डॉक्टरांसह अपघात मदत ट्रेन (एआरटी) आणि वैद्यकीय उपकरणे व्हॅन सकाळी 4.45 वाजता घटनास्थळी पोहोचले, अधिकाऱ्यांनी सांगितले. एआरटीसह इरोड जंक्शन (तामिळनाडू) येथील एक पथकही घटनास्थळी रवाना झाले.
 
दक्षिण पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ अनिश हेगडे यांनी सांगितले की, सर्व 2348८ प्रवासी सुरक्षित आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. प्रवाशांसह 6 डबे आणि SLR चा अप्रभावित मागील भाग टोपपुरु आणि पुढे सेलमच्या दिशेने वळवला जाईल. टोपपुरू येथे थांबवणार आहे. ते पुढे म्हणाले की, प्रवाशांच्या सोयीसाठी टोपपुरू येथे 15 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी पाच बसेस पाठवण्यात आल्या आहेत.