1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. 5 tigers die suspiciously in Mahadeshwar Wildlife Sanctuary

महाडेश्वर वन्यजीव अभयारण्यात ५ वाघांचा संशयास्पद मृत्यू

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील नर महाडेश्वर वन्यजीव अभयारण्यात ५ वाघांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पाचही वाघ मृतावस्थेत आढळले. यामध्ये एक वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा समावेश आहे. वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत वनमंत्री यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाला चौकशीचे आदेश दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांना लेखी सूचना देताना मंत्री म्हणाले की, सरकारने जंगलात ५ वाघांच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. बुधवारी संध्याकाळी ग्यामच्या वनक्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना या वाघांचा अनैसर्गिक मृत्यू समोर आला. वन कर्मचाऱ्यांना संशय आहे की वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला. वन विभागाच्या म्हणण्यानुसार, वाघांच्या मृत्युच्या ठिकाणापासून काही अंतरावर एका गायीचा मृतदेहही आढळला. वन विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, वाघांच्या मृत्युचे कारण संशयास्पद आहे आणि शवविच्छेदनानंतर खरे कारण कळेल.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: भाजपने ३ राज्यांमधील निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी 'राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची' नियुक्ती केली