तांत्रिकाच्या प्रभावाखाली येऊन ५ वर्षांच्या चिमुकलीचा दिला बळी, पती-पत्नीला अटक
Goa News : गोव्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका निपुत्रिक जोडप्याने त्यांच्या शेजाऱ्याच्या पाच वर्षांच्या मुलीचा बळी दिला. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तांत्रिकाने त्याला एका मुलाचा बळी देण्यास सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात एका निष्पाप लहान मुलीच्या हत्येचा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलीला जमिनीत गाडण्यात आले. असे सांगितले जात आहे की, या जोडप्याने हे काही तांत्रिकाच्या सल्ल्यावरून केले आहे. एका जोडप्याला त्यांच्याच शेजारच्या पाच वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या मागे पुरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली. सध्या पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
चौकशीदरम्यान पती-पत्नी दोघांनीही तांत्रिकाबद्दल माहिती दिली. दोघांनाही मूलबाळ नव्हते. यामुळे त्या जोडप्याने काळी जादू करणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घेतला. त्यांनी एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलीची हत्या केली होती, जी त्यांनी पोलिसांजवळ कबूल केली.