शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (09:38 IST)

इंदूरमध्ये 7 जण जिवंत जाळले: इमारतीला आग, काही मिनिटांतच गुदमरल्याने झोपेत काहींचा मृत्यू

Indore Building fire
इंदूरच्या विजय नगरमधील एका 2 मजली इमारतीला शुक्रवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. पोलिस आयुक्त यांनी सांगितले की, आगीमुळे 7 जण जिवंत जळाले आहेत. मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यावेळी सर्वजण झोपले होते. आगीने लगेचच भीषण रूप धारण केले. लोकांना जाग येताच काही समजण्याआधीच काही जण जळाले.
 
माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी मृतांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
 
9 जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढले
मिळालेल्या माहितीनुसार, खजराना रिंगरोडवरील स्वर्ण कॉलनीत एका 2 मजली इमारतीला भीषण आग लागली. येथे 13 दुचाकी व एक चारचाकी वाहने जळाली आहेत. इमारत इन्साद पटेल यांची आहे. येथे 10 फ्लॅट होते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 9 जणांची सुटका करून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आगीत भाजून ज्यांचा मृत्यू झाला ते या इमारतीत भाड्याने राहत होते. यातील काही लोक अभ्यासासाठी आले होते. काही लोक नोकरीत होते.
 
झोपेतच मरण
आगीने एवढं भीषण रूप धारण केलं की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. झोपेतून जागे झालेल्या लोकांना काही समजेल तोपर्यंत काही जण जिवंत जळून मेले तर काही गुदमरून मरण पावले. मृतांमध्ये ईश्वर सिंग सिसोदिया (45), नीतू सिसोदिया (45), आशिष (30), गौरव (38), आकांक्षा (25) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 आणि 45 वयोगटातील दोघांची ओळख पटलेली नाही. मृतांमध्ये एका जोडप्याचाही समावेश आहे.
 
शेजारीच घर बांधले जात होते, तीन दिवसांपूर्वीच येथे आले होते
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता, मात्र वीज येताच पार्किंगच्या मीटरला आग लागली. प्रत्यक्षदर्शी एहसान पटेल यांनी सांगितले की, रात्री 3 वाजण्याच्या सुमारास आम्हाला आवाज ऐकू आला. मी बाहेर पाहिले तर इमारतीला आग लागली होती. आम्ही बादल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. माझा भाऊ या इमारतीत राहतो. याशिवाय काही विद्यार्थी आणि इतर कुटुंबेही तेथे राहतात. तीन-चार दिवसांपूर्वी काही पाहुणेही आले होते.
 
शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची भीती
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय नगरच्या स्वर्णबाग कॉलनीतील एका दुमजली इमारतीत आग लागल्याची माहिती आम्हाला रात्री 3 वाजता मिळाली. माहिती मिळताच पथक तात्काळ रवाना झाले. येथे आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली, मात्र काही लोकांचा मृत्यू झाला होता.
 
इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. वाहनांना आग लागल्याने त्याने भीषण रूप धारण केले. त्यांनी सांगितले की, या इमारतीत विद्यार्थ्यांसह कुटुंबेही राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.