शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (08:06 IST)

कडाक्याच्या उन्हात आता चक्रीवादळाचे संकट; हवामान विभागाने दिला हा इशारा

cyclone
संपूर्ण भारतात उन्हाची तीव्र लाट सुरू असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे की, दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळेच दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

हा कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व दिशेने सरकत आहे. हा कमी दाबाचा पट्टा ७ मे ला सायंकाळी दक्षिण पूर्व बंगालच्या खाडीत आणि ८ मे रोजी सायंकाळपर्यंत हा कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळाचे स्वरुप धारण करण्याची शक्यता आहे.यासंदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यासंदर्भात वेळोवेळी अंदाज दिले जाणार आहेत. त्याकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.