शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सूरत , शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (17:12 IST)

Surat News एकाच कुटुंबातील 7 जणांनी केली आत्महत्या

surat suicide
7 people of the same family committed suicide, गुजरातमधील सूरतमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबीयांनी हे पाऊल उचलल्याचे या घटनेबाबत सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
 
या प्रकरणाबाबत सुरतचे डीसीपी राकेश बारोट म्हणाले, “एका कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली आहे. त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.”