गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (12:18 IST)

ट्रकला धडकली यात्रींनीं भरलेली बस, दोन जणांचा मृत्यू तर 14 जण गंभीर जखमी

देवरिया मध्ये मदनपूर क्षेत्राच्या बहसूआ मध्ये गुरुवारी रोडवेज बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 14 जण गंभीर जखमी झाले आहे. घटनास्थळी पोलीस लोकांना बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच जखमींना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. 
 
देवरिया डेपोची बस सकाळी साडेसात वाजता गोरखपूरच्या दोहरिघाटला जाण्यासाठी निघाली होती. समोर येणार अनियंत्रित ट्रक थेट बसला येऊन धडकला. दोन वाहनांची समोरासमोर ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये एक महिला आणि एका पुरुषाच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयामध्ये दाखल केले या आहे.