शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (14:04 IST)

भंगार विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

gang rape
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील ब्रिज विहार परिसरात 14वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचे भंगार माल विकण्याचे दुकान आहे.या घटनेची माहिती मिळतातच संतप्त लोकांनी दुकानाची तोडफोड केली.

सदर घटना ब्रिजविहार चौकी परिसरात घडली आहे. बुधवारी सायंकाळी घरातील महिला आणि पुरुष कामावर गेले असता भंगार खरेदी विक्री करणाऱ्या 3-3 मुलांनी घराच्या मागील दारातून घरात प्रवेश करत अल्पवयीन मुलीला बेशुद्ध करणं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.मुलीने विरोध केल्यावर तिला मारहाण केली.

ब्रिज विहार चौकी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने सकाळी लिंक रोड पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली की, तिच्या अल्पवयीन मुलीवर भंगार व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाने बलात्कार केला. या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर परिसरातील लोक संतप्त झाले असून महिलांनी आंदोलनही केले.

 परिसरातील रद्दीची दुकानेही हटविण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. जमावाने रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करत आजूबाजूची दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच भंगाराच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले, तेथे उभी असलेली वाहने व मालाची तोडफोड करण्यात आली आणि एक ई-रिक्षा पेटवून दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर शांतता प्रस्थापित झाली.पोलीस प्रकरणाचा तापास करत आहे. 
 
पीडितेचे कुटुंब गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात आले तेव्हा त्यांनी केवळ एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर लगेच गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.आता पीडितेच्या कुटुंबीयांनी 3-4 तरुणांवर आरोप केले आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. 
Edited By - Priya Dixit