शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:38 IST)

पुण्यात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाकडून बलात्कार, आरोपीला अटक

rape
पुण्यात एका 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका 67 वर्षीय वृद्ध व्यक्तीने बलात्कार केला. मुलीने घडलेलं 'गुड टच, बॅड टच' सत्रादरम्यान शिक्षकांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. 

आरोपीने मुलीला शाळेत जाताना अडवले आणि तिला चॉकलेट देण्याचा आमिषाने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मुलीने तिथून पळ काढला. मात्र शुक्रवारी शाळेतून घरी परत जाताना आरोपीने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. 

शनिवारी शाळेत गुड टच बॅड टचच्या सत्रादरम्यान शाळेत तिने घडलेले सांगितले.शाळा प्रशासनाने मुलीच्या पालकांना या प्रकरणाची माहिती दिली. पालकांनी आरोपीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 Edited by - Priya Dixit