बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2024 (19:21 IST)

चॉकलेट खाल्ल्याने दीड वर्षाच्या मुलीची प्रकृती ढासळली

पंजाबमध्ये एका दीड वर्षाच्या मुलीला चॉकलेट खाल्ल्यानंतर रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मुलगी लुधियानाची रहिवासी आहे. मुलीसाठी चॉकलेट त्याच पटियाला शहरातून खरेदी करण्यात आले होते, जिथे काही दिवसांपूर्वी मुलीचा केक खाल्ल्यानंतर तिच्या वाढदिवसाला मृत्यू झाला होता. याची माहिती मिळताच आरोग्य विभागात खळबळ उडाली. ज्या दुकानातून चॉकलेट खरेदी करण्यात आले होते त्या दुकानात अधिकारी तातडीने पोहोचले. मुलीला खायला दिलेले चॉकलेट एक्स्पायरी डेटचे असल्याचे तपासणीत समोर आले. मुलगी पतियाळा येथे एका नातेवाईकांकडे आली होती. 

मुलीच्या नातेवाईकाने सांगितले की राविया नावाची ही चिमुकली काही दिवसांपूर्वी पतियाळा येथे आली होती. ती घरी लुधियाना परत जाताना त्यांनी एका दुकानातून गिफ्ट पॅक घेतले त्यात चिप्स, कुरकुरे, चॉकलेट, ज्यूस होते. लुधियाना आल्यावर तिने चॉकलेट खाल्ल्यावर तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या काही वेळातच तिची प्रकृती ढासळू लागली. तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.   

मुलीच्या नातेवाईकाने सांगितले की हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली. आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह ते तात्काळ त्या दुकानात गेले जिथून मुलीसाठी गिफ्ट बास्केट खरेदी करण्यात आली होती. तेथे पोहोचल्यानंतर त्याला दिलेले चॉकलेट एक्सपायरी डेटचे असल्याचे आढळून आले. दुकानात आणखी वस्तू देखील एक्स्पायरी डेटच्या पडून होत्या. 

आरोग्य विभागाच्या पथकाने दुकानात पडलेल्या मुदत संपलेल्या सर्व वस्तू जप्त केल्या. यानंतर पोलिसांनाही तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुदत संपलेल्या वस्तूंची विक्री झाल्याची चौकशीही आरोग्य विभागाने सुरू केली आहे. 
 
Edited By- Priya Dixit