रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (11:39 IST)

सहा मजली इमारतीला भीषण आग, 42 जणांना सुखरूप बाहेर काढले

Indore News : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका सहा मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी रात्री आग लागली, त्यानंतर प्रशासनाने इमारतीत अडकलेल्या 42 जणांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.   
 
मिळालेल्या माहितीनुसार इंदूर मधील विजय नगर चौकाजवळ असलेल्या व्यावसायिक इमारतीत आग लागली. या इमारतीत दुकाने व कार्यालये आहे. अग्निशमन विभागाचे सहायक उपनिरीक्षक म्हणाले की, “आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा इमारतीत धुराचे लोट होते. काही लोकांनी आम्हाला फोन करून इमारतीत अडकल्याचे सांगितले. अग्निशमन विभागाने इमारतीत अडकलेल्या 42 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असे अधिकारींनी सांगितले आहे. 

Edited By- Dhanashri Naik