गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (16:52 IST)

भटक्या कुत्र्याचा पाठलाग केल्यामुळे महिलेच्या स्कुटीची कारला धडक,व्हिडिओ व्हायरल

A womans scooter collided with a car  after chasing a stray dog In   Berhampur city in Odisha
भटक्या  कुत्र्यांमुळे अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्याचे समोर येतात.अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा कोणी गाडीने जात असेल तेव्हा कुत्रे त्याच्या मागे धावू लागतात. अशीच एक घटना ओडिशातून समोर आली आहे, जिथे एक महिला स्कूटी चालवत आहे आणि कुत्रे मागे पळत आहेत. कुत्रा चावण्याच्या भीतीने महिलेने आपल्या स्कूटीचा वेग वाढवला, त्यामुळे तिचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कूटी रस्त्याच्या कडेवरच्या कारला धडकली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महिले व्यतिरिक्त स्कूटीवर बसलेले एक लहान मूल आणि दुसरी महिला देखील जखमी झाली आहे.ओडिशातील बेरहामपूर शहरात ही घटना घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्यावर कोणीच दिसत नाही. व्हिडिओमध्ये महिलेच्या स्कूटीच्या मागे पाच भटके कुत्रे धावत आहेत. भटक्या कुत्र्यांना टाळण्यासाठी महिला स्कूटी वेगाने चालवत आहे. एक लहानमुल स्कूटीवर पुढे उभे असल्याचे दिसत आहे. महिला स्कूटी चालवत आहे आणि दुसरी महिला मागे बसली आहे. रस्त्याच्या कडेला एक गाडी उभी आहे. भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने स्कूटी चालवणाऱ्या महिलेचा तोल गेला. आणि स्कूटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडकली. या भीषण धडकेत महिला उडी मारून बालकासह रस्त्यावर पडली. स्कूटी रस्त्यावर पडली असताना एक कुत्राही त्याखाली येतो. मात्र, अपघात होताच कुत्रे मागे पळून जातात. या अपघातात हे तिघे जखमी झाले आहेत . . 

 Edited By - Priya Dixit