शुक्रवार, 24 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 28 जुलै 2022 (22:23 IST)

Airforce MiG Crash:राजस्थानच्या बारमेरमध्ये मिग क्रॅश, दोन पायलट होते विमानात

MiG-21 Crash in Rajasthan Barmer: राजस्थानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे. हवाई दलाच्या मिग-21 मध्ये दोन पायलट होते. हा अपघात इतका भीषण होता की,  मिगचा ढिगारा अर्धा किलोमीटर दूर पसरला होता. हा अपघात बारमेरच्या बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडा गावात झाला.  

अपघातापूर्वी मिग-21 हे विमान भीमडा गावाभोवती फिरत होते. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.