गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 जानेवारी 2023 (17:07 IST)

लखनौहून कोलकात्याला जाणाऱ्या एअरएशियाच्या विमानाला पक्षी धडकला , विमानाची ची इमर्जन्सी लँडिंग

लखनौहून कोलकात्याला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला पक्षी आदळल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. फ्लाइटच्या टेक ऑफ दरम्यान हा अपघात झाला. पक्षी आदळल्याने मोठी दुर्घटना टळली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित आहे. सुदैवाने कोणती मोठी घटना घडली नाही.
 
जगात पहिल्यांदा पक्षी विमानाला धडकण्याची घटना 1905 मध्ये समोर आली होती. तेव्हा ऑर्विल राइट एका शेतात विमान उडवत होते. तो पक्ष्यांच्या कळपाच्या मागे लागला होता. त्यानंतर एका पक्ष्याची टक्कर होऊन मृत्यू झाला. 
 
Edited By - Priya Dixit