शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:08 IST)

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव स्वगृही

akhilesh and ramgopal yadav
अवघ्या काही तासांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव स्वगृही अर्थात समाजवादी पक्षामध्ये परतले आहे. शुक्रवारी रात्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यांच्यावर 6 वर्षांसाठी करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. शिवपाल यादव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुलायमसिंह यादव, आजम खान आणि स्वतः अखिलेश यादवदेखील उपस्थित होती. शनिवारी सकाळपासूनच उत्तर प्रदेशातील राजकारणात तासातासाला नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत.