गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (11:44 IST)

C130J सुपर हरक्यूलिस नंतर आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर युद्ध सराव

युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमाने टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी लखनौ-आग्रा हायवेवर एक-एक करुन लँडिंग केलं. वायुदलाची 20 फायटर विमानं, सुखोई 30, हरक्युलस, जॅग्वार, मिराज आणि मिग यांसारख्या लढाऊ विमानांना महामार्गावर लँड होताना पाहणं, ही पर्वणी ठरत आहे.
 
युद्धस्थितीत रनवेचं नुकसान झाल्यास शत्रूवर पलटवार करण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची ठरते. 1965 साली झालेल्या युद्धात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बॉम्ब टाकून भारताच्या एअरबेसची नासधूस केली होती. त्यामुळे भारतीय वायुसेनेला ऑपरेशन करताना अडचणी आल्या.
 
आधुनिक युद्धशास्त्रात लढाऊ विमानांना लँडिंग ग्राऊंड म्हणून एक्स्प्रेस वे आणि हायवे वापरण्यास तयार केलं जातं. फक्त भारतच नाही, तर पाकनेही 2000 मध्ये अशा प्रकारचं ड्रिल केलं होतं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, चीन, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांनीही हा युद्धाभ्यास केला आहे. वायुदलाच्या युद्धाभ्यासामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत लखनौ-आग्रा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.