बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (16:29 IST)

अयोध्येतील राम मंदिराचा सर्व खर्च उचलण्यासाठी एका उद्योगपतीची तयारी

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी हातभार लागावा यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी एकूण ११०० कोटींचा खर्च येईल असा अंदाज मंदिर उभारणी समितीचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी मंदिराचा सर्व खर्च उचलण्यासाठी एका उद्योगपतीने तयारी दर्शवल्याचा खुलासा केला. त्यांचं नाव जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
“२०० फुटांपर्यंत फक्त रेती असून त्याठिकाणी हजार वर्ष टिकेल असं मंदिर उभारण्याचे याआधी प्रयत्न झाले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पण आता मुंबई, गुवाहाटी, हैदराबाद येथील आयआयटी संस्थांच्या मदतीने तज्ञांची एक समिती नेमली असून त्यांनी दोन पर्याय दिले आहेत. त्यातील कोणता पर्याय निवडावा यासाठी दोन दिवस बैठक पार पडली. दगडांच्या आधारे हे मंदिर उभं राहील आणि हजार वर्ष टिकेल,” असं गोविंद देवगिरी महाराज यांनी म्हटलं आहे.