अखेर अंदमानातून सुटका
अनेक दिवस महा भयंकर अश्या चक्रीवादळामुळं अंदमान इथं अडकून पडलेल्या सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.यामध्ये आपल्या देशातील २,३७६ प्रवाशी गेल्या काही दिवसांपासून अडकून पडले होते. ज्यात महाराष्ट्रातल्याही 50 हून अधिक लोकांचा समावेश होता. या सर्वाना भारतीय लष्कराने सुखरूप बाहेर काढले आहे. यामध्ये कोणतीही जीविती हानी झाली नाही हे विशेष आहे. हवामानात थोडा बदल झाल्यानंतर नौदल, तटरक्षक दल आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सर्व पर्यटकांची सुटका केली. एमआय 17 व्ही-5 मिलिटरी ट्रांसपोर्ट हेलिकॉप्टर, तीन पवन हंस हेलिकॉप्टर आणि नौदलाच्या सात नौवकांनी पर्यटकांची सुटका केली.