रविवार, 13 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (12:24 IST)

Ashoknagar: दृश्यम चित्रपट पाहिल्यानंतर महिलेने केली पतीची हत्या

murder
मध्यप्रदेशातील अशोक नगर मध्ये बेपत्ता तरुणाच्या प्रकरणात पोलिसानां मोठे यश मिळाले आहे. या तरुणाची तिच्या पत्नीने दृश्यम चित्रपट पाहून आपल्या प्रियकरासह 6 महिन्यांपूर्वी हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर पुरावे लपविण्यासाठी आरोपी पत्नी आणि प्रियकराने दृश्यम हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला. त्यानंतर पतीवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिने त्याला आपल्यासोबत नेले. वाटेत विदिशा जिल्ह्यातील शमशाबाद येथे प्रियकरासह तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.
 
सदर प्रकरण मध्यप्रदेशातील अशोक नगर येथील आहे. अशोकनगर शहरातील सौरभ जैन बेपत्ता आणि त्याचा खुनाचा संशय नातेवाईकांनी केला होता. या संदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या नंतर पोलीसांनी  कारवाई करत प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी पोलिसांनी सौरभची पत्नीऋचा जैन  आणि तिच्यासह राहणाऱ्या दीपेश भार्गव यांची चौकशी केली. 
 
सौरभ जैनचे आठ वर्षांपूर्वी ऋचा जैनसोबत लग्न झाल्याचे उघड झाले. दरम्यान, रिचा जैन आणि दीपेश भार्गव यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले. दोघांनी मिळून तिच्या पतीला मारण्याचा कट रचला. यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी आरोपी पत्नीने सौरभ जैनला उपचारासाठी सांगून येथून नेले. सिरोंज, विदिशा येथे त्यांनी 35000 ला कार भाड्याने घेतली.
 
विदिशा जिल्ह्यातील शमशाबादजवळील कोलुआजवळ दोघांनी सौरभ जैन यांची दगडाने ठेचून हत्या केली. यादरम्यान आरोपी पत्नी आणि प्रियकराने पतीच्या मृत्यूची योजना आखली. तसेच पुरावे लपवण्यासाठी दृश्यम हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला. यानंतर नवऱ्याची हत्या झाली आणि त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तिने वारंवार पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. सुरुवातीला आरोपींनी सौरभ जैनच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळून टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी हड्ड्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रथम शहरातील करबला सांगितले. यानंतर मृतदेहाची अस्थी नदीत व नंतर तुळशी सरोवर तलावात टाकण्याचे सांगण्यात आले.

शमशाबाद येथे पतीची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही मयताच्या एटीएममधून पैसे काढून फसवणूक करत होते.काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या सौरभ जैन यांनी त्यांची 5 बिघे जमीन 11.5 लाख रुपयांना विकली होती. पैसे पत्नीकडे ठेवले होते. यादरम्यान त्यांना ट्रॅक्टरची आर्थिक मदतही मिळाली. 
 
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे शोधले. शमशाबाद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खून आणि पुरावे लपविण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. मुलाच्या शाळेत शाळाच सोडण्याचा दाखला आणायला गेली असता तिने मुलाचे वडील जगात नसल्याचे सांगितले. त्यानंतर 6 महिन्यांनी मयत सौरभच्या भावाच्या तक्रारीनंतर आरोपी प्रियकरासह आरोपी  पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
 
 Edited by - Priya Dixit