शनिवार, 15 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 फेब्रुवारी 2018 (09:45 IST)

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणी आजपासून सुनावणी

babri masjid and ram mandir

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावरील विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. मुस्लिम संघटनांच्यावतीने कपिल सिब्बल आणि तीन वकिलांनी याप्रकरणी संविधानिक खंडपीठाची मागणी करत २०१९ च्या निवडणुकीनंतर सुनावणी करण्याची मागणी केली होती. मात्र, दीपक मिश्रा यांच्या विशेष खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत या प्रकरणावरील सुनावणी टाळता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या आयोध्या प्रकरणी रामजन्मभूमी ट्रस्ट, रामलल्ला यांच्यावतीने जेष्ठ वकील हरीश साळवे आणि सी. एस. वैद्यनाथन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर बाजू मांडली होती.  याप्रकरणातील सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर सुनावणी व्हायला हवी, असे मत उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने अॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडले होते.