शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (11:40 IST)

Bank closed :काय सांगता, 5 दिवस बँका बंद राहणार

आपणांस बँकेशी निगडित काही कामे असतील तर ते लवकर करावे,कारण उद्या गुरुवारपासून सलग 5 दिवस बँका बंद राहणार आहे. हे नियम सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँकांसाठी लागू असतील.
 
या आठवड्यात गुरुवारी म्हणजेच 19 ते 23 ऑगस्टपर्यंत बँकांना सलग 5 दिवस सुट्टी असेल. तथापि, या बँक सुट्ट्या एकाच वेळी सर्व राज्यांना लागू होणार नाहीत. प्रत्येक राज्यात स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
जाणून घ्या कोणत्या राज्यात सुट्टी कधी असेल?
1 .19 ऑगस्ट - मुहर्रम (अशुरा) -अगरतला,अहमदाबाद,बेलापूर,भोपाळ,हैदराबाद, जयपूर,जम्मू,कानपूर,कोलकाता,लखनौ मुंबई,नागपूर,नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर येथे बँका बंद
2. 20 ऑगस्ट - मुहर्रम / फर्स्ट ओणम - बंगळुरु,चेन्नई, कोची आणि तिरुअनंतपुरम येथे बँका बंद
3. 21 ऑगस्ट - थीरुवोनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
4. 22 ऑगस्ट - रविवार
5. 23 ऑगस्ट - श्री नारायण गुरु जयंती- कोची आणि तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद.