शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (18:00 IST)

कोरोनाची लक्षणे दिसल्याने घाबरून, जोडप्याने भीतीमुळे आत्महत्या केली

कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर घाबरून कर्नाटकातील मंगळुरू येथे 40 वर्षीय पुरुष आणि त्याच्या पत्नीने कथितरित्या आत्महत्या केली. रमेश आणि गुणा आर सुवर्णा अशी या जोडप्याची नावे आहे. 
 
पोलीस सूत्रांनी सांगितले की, दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत होती. सोमवारी या जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी मंगळूरू पोलीस आयुक्तांना एक व्हॉईस मेसेज पाठवून सांगितले की, ते कोरोना विषाणूच्या प्रसारमाध्यमांमुळे उद्भवलेल्या चिंता आणि अस्वस्थतेचा सामना करण्यास असमर्थ आहेत आणि म्हणूनच ते आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत.
 
आयुक्तांनी लगेच प्रतिक्रिया दिली आणि दोघांनाही कोणतेही अप्रिय पाऊल उचलण्यापासून रोखले. त्यांनी अनेक माध्यम समूहांना लवकरात लवकर या जोडप्याशी संपर्क साधण्याची विनंती केली. 
 
तथापि, पोलिस अपार्टमेंटमध्ये पोहोचले तोपर्यंत हे जोडपे आधीच मृत झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सुसाईड नोटमध्ये आणखी एका कारणाचा उल्लेख केला होता. 
 
या महिलेने त्यात आपल्या मुलाच्या मृत्यूचाही उल्लेख केला होता, ज्याने जन्मानंतर केवळ 13 दिवसांनी जगाचा निरोप घेतला होता. चिठ्ठीत असेही लिहिले होते की, दररोज दोन इंसुलिन इंजेक्शन घेत असूनही महिलेचा मधुमेह नियंत्रणाबाहेर होता.
 
चिठ्ठीत असेही लिहिले आहे की, आमच्या दोघांच्या वस्तू गरीबांमध्ये वाटून द्यावा.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.